आपला भारत हा एक प्राचीन आणि विशाल देश आहे. येथे नैसर्गिक , भौगोलिक विविधते बरोबरच भाषा, खान-पान, राहणीमान इ. गोष्टींमध्येही विविधता आढळून येते. तसेच शहरी, ग्रामीण, वनात राहणारे अशीही विविधता दिसते. अशा या विविधतेने नटलेल्या परंतु आंतिरक सूत्र एक असलेल्या समाजात कृषी, शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, कला, क्रीडा, इ. विषयांमध्ये राष्ट्रिहतैषी दृष्टिकोन घेऊन व ग्रामिवकास, आपत्ती निवारण यांसारख्या विषयांमध्ये ‘नरसेवा ही नारायण सेवा’ हा भाव मनात ठेऊन सेवाभावी वृत्तीने काम करण्याच्या उद्देशाने "शिवसेवा प्रतिष्ठान" ची स्थापना करण्यात आली.
जगतगुरु संत तुकाराम महाराज व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पशार्ने पावन झालेल्या भूमीत ‘देहूरोड’ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०१७ ला ‘रेल्वे कामगार संघ’ व “शिवसेवा प्रितष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
Activities
Social Activity Organisation, Social Services, Social Work. Govt. Service Support, Disaster Management, Environmental Services, Rural Development, Study Circle, Skill Development